21 सप्टेंबर रोजी शनिवारी न भूतो "ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी मागणी पदयात्रा निश्चित - डाॅ.हंसराज वैद्य

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/09/2024 9:26 AM

नांदेड :- केंद्र व राज्य शासन अनेक लोकपयोगी तथा लोकप्रिय योजना कार्यान्वित करून अंमल बजावनी करताना दिसत आहेत.केंद्र शासनाने "आयुष्यमान भारत योजना,प्रधान मंत्री वयोश्री योजना,तर महाराष्ट्र शासनाने मुख्य मंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यान्वित करून अंमल बजावनी करत आहेत.पण ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न अनेक वर्षा पासून शासन दरबारी प्रलंबित आहेत.ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यात फेस्काॅम महासंघ व देश पातळीवर आयस्काॅन  वरिष्ठ संघटणा,नांदेड मधील सहयोग ज्येष्ठ नागरिक संघासह राज्यातील इतरही ज्येष्ठ नागरिक संघ शासनाकडून त्या सोडऊन घेण्यासाठी सतत पाठपुरावा करत आहेत.पण स्थानिक जनता,लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य शासनही त्यांच्या मागण्यांकडे फारसे सकारात्मक दृष्टीने व संवेदनशील रित्या पहाण्यास तयार नाहीत.म्हणून येत्या शनिवारी दि.21/9/24 रोजी समाज,स्थानिक लोक प्रतिनिधी, महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नांदेड येथे ज्येष्ठ नागरिकांची न भूतो "ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी मागनी पदयात्रा" काढण्यात येणार.
सर्व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनी कलामंदिर मैदानावर सकाळी साडे नऊ वाजता जमणार आहेत.डाॅ.हंसराज वैद्य,गिरिष बार्‍हाळे , प्रभाकर कुंटूरकर व ज्येष्ठ पत्रकार माधवराव पवार काटकळंबेकर यांच्या नेतृत्वाखाली अरविंद महाराज मोरे सोनखेडकर , सु.ग.चव्हाण महाराज तथा डाॅ.हंसराज वैद्य यांच्या मार्ग दर्शनानंतर नभूतो अशी "ज्येष्ठ नागरिक मागणी पद यात्रा"  निघणार आहे.सकाळी आकरा वाजता नांदेडचे ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते मा.नविनजी भाई ठक्कर व नांदेडच्या ज्येष्ठ नागरिक संघांचे आधारस्तंभ तथा सर्व ज्येष्ठांचे मार्ग दर्शक मा.सुभाषरावजी बार्‍हाळे हे ज्येष्ठ नागरिकांच्या पदयात्रेस हिरवी झंड्डी दाखवतील. पद यात्रेत ज्येष्ठ महिला-पुरूष चार-चारच्या साखळीनीं एकमेकास आधार देत अत्यंत सावकाश चालणार आहेत.  पदयात्रा स्वंयशाशित व अत्यंत शिस्तित कलामंदिर,शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,वैद्य रूग्णालय-जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, वजिरा बाद-मुथा चौक, श्री छ.शिवाजी महाराज पुतळा,महानगर पालिका कार्यालय-सिव्हील हाॅस्पिटल समोरून जिल्हाधिकारी कार्यालया समोर प्रस्थान करेल. जिल्हाधिकारी महोदया मार्फत सर्व मा.प्रधान मंत्रीजी, नितीनजी गडकरी,मुख्य मंत्रीजी, उपमुख्य मंत्रीजी द्वयांना निवेदन पाठऊन देण्यात येतील.ज्येष्ठ नागरिक जनतेचे, स्थानिक लोक प्रतिनिधींचे,राज्य शासनाचे तथा केंद्र शासनाचे लक्ष वेधण्या साठी लाक्षणिक अन्न-पाणी त्याग(उपोषण) करतील! संद्याकाळी साडेचार  दर्म्यान पदयात्रा व अन्न-पाणी त्याग अंदोलनाची सांगता होइल.

Share

Other News

ताज्या बातम्या