तृतीयपंत्याने केल प्रेम आणि समाधान ने केला गेम

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 16/09/2024 11:33 AM


म्हसवड पोलिसांकडून आरोपी अवघ्या सहा तासात ताब्यात 

आरटी आय न्यूज नेटवर्क 
विजय जगदाळे 

मसवड दि:म्हसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोटेवाडी ता.माण येथील तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे वय -२५ वर्ष याच्या खूनाप्रकरणी म्हसवड पोलिसांनी हातावर गोंदलेल्या नावाच्या आधारे अवघ्या सहा तासात आरोपीस केले जेरबंद .
याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान विलास चव्हाण रा. दिवड असे खून करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. मयत राशी आणि संशयित समाधान याचे बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. यातून राशी याने मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तुझ्या घरी येऊन रहायचे आहे, असा तगादा समाधानकडे लावला होता. मात्र समाधान हा विवाहित असल्याने तो राशीची मागणी पूर्ण करू शकत नव्हता. 
बऱ्याच दिवसापासून चाललेल्या या प्रकाराला समाधान कंटाळला होता.
पाच दिवसापूर्वी त्याने राशी यास म्हसवडमधील मेघासिटीजवळ सायंकाळी आठच्या सुमारास बोलावून साडीने त्याचा गळा आवळून खून केला. राशी मयत झाल्याची खात्री पटताच समाधानने त्यास विहरीजवळ नेऊन पुरावा नष्ट करण्यासाठी शेजारी पडलेल्या विद्युत वायरला भला मोठा दगड मृतदेहाला बांधून मृतदेह विहिरीत टाकला. काल मयत राशीचा मृतदेह फुगून विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता. याबाबतची पोलिसांना माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शरीर पूर्णपणे विद्रूप झाल्याने त्याची ओळख पटवणे म्हसवड पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांच्या नजरेने हातावर गोंदलेले आईबाबा आणि समाधान हे शब्द ओळखले. तांत्रिक माहिती आणि गोपनीय खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून त्यांना राशीची ओळख पटली. ओळख पटल्यानंतर पोलिसांना राशीचे आणि दिवड येथील समाधानाचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित समाधान यास दिवड येथील शेतातून ताब्यात घेतले आहे. मध्यरात्री आरोपी निष्पन्न करून त्यास सकाळी नऊ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक सही, सातारा, श्रीमती वैशाली कटुकर, व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो, दहिवडी विभाग, दहिवडी श्रीमती अधिनी शेंडगे, यांचे मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक, अनिल वाघमोडे, अमंलदार शशिकांत खाडे, अमर नारनवर, पोपट चव्हाण, रुपाली फडतरे, जगनाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, धिरज कवडे, वसिम मुलाणी, श्रीकांत सुद्रीक यांनी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या