भगूरवासीयांसाठी आनंदाची बातमी: दोन मोफत दवाखाने सुरू; सर्व प्रकारच्या आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन भगूरच्या नगराध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे यांनी केले आहे
भगूर प्रतिनिधी :
भगूर नगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शहरामध्ये दोन महत्त्वाचे दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. सर्वसामान्यांना घराजवळच चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. असे नगराध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे यांनी सांगितले
१) आपला दवाखाना: भगूर नगरपालिका जुना दवाखाना, भगूर.
२) नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र: अभिनव शाळे जवळ, पाण्याची टाकी, दत्त मंदिर रोड, भगूर.
प्राथमिक स्तरावर उपलब्ध असणाऱ्या १३ मोफत आरोग्य सेवा:
१) गर्भधारणा आधी व बाळंतपणाची काळजी: आई आणि बाळाच्या सुरक्षेसाठी तपासणी व मार्गदर्शन.
२) नवजात आणि अर्भक आरोग्य सेवा: लहान बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी.
३) बालपण आणि किशोरवयीन आरोग्य सेवा: वाढत्या वयातील मुला-मुलींच्या आरोग्याशी संबंधित सुविधा.
४) कुटुंब नियोजन: कुटुंब नियोजनाबाबत मार्गदर्शन व आवश्यक सेवा.
५) संसर्गजन्य रोगांचे व्यवस्थापन: विविध साथीच्या आजारांवर नियंत्रण व उपचार.
६) तीव्र, सामान्य आजार आणि किरकोळ औषधांसाठी बाह्य रुग्णांची सामान्य काळजी: दैनंदिन आजारांवर ओपीडी (OPD) उपचार.
७) संसर्गजन्य रोगांची स्क्रीनिंग, प्रतिबंध, निदान व उपचार: आजारांचे वेळेत निदान व प्रतिबंधात्मक उपाय.
८) सामान्य नेत्र रोग आणि ई.एन.टी. (नाक, कान, घसा) समस्यांची काळजी: डोळे, कान, नाक व घशाच्या आजारांवर उपचार.
९) मूलभूत मौखिक आरोग्य सेवा: दातांच्या व तोंडाच्या आरोग्याची काळजी.
१०) वृद्ध आणि अपंगांमापक आरोग्य सेवा: ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष आरोग्य सुविधा.
११) मानसिक आरोग्य आणि किशोरवयीन मानसिक आरोग्य सेवा: मानसोपचार व समुपदेशन.
१२) यौन आणि प्रजनन आरोग्य सेवा: जननेंद्रियाच्या समस्या व आरोग्याबाबत मार्गदर्शन.
१३) योग आणि आयुष (AYUSH): नैसर्गिक जीवनशैली व योगासनांचे मार्गदर्शन.
"सर्वसामान्यांना वेळेवर उपचार मिळून सुदृढ समाज निर्माण व्हावा आणि आई-बालकांचे भविष्य सुरक्षित राहावे यासाठी भगूर नगरपालिका सदैव तत्पर आहे. भगूरमधील सर्व नागरिकांनी या सुसज्ज दवाखान्यांचा व आरोग्य सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा," असे आवाहन नगराध्यक्ष प्रेरणा विशाल बलकवडे यांनी केले आहे.