स्वातंत्र्यवीर सावकर यांना 'भारतरत्न' द्या; भगूर नगर परिषदेच्या सभेत एकमताने

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 07/10/2026 12:43 AM

स्वातंत्र्यवीर सावकर यांना 'भारतरत्न' द्या; भगूर नगर परिषदेच्या सभेत एकमताने ठराव मंजूर
​भगूर वार्ताहर:
भगूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली व सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्याबाबत शासनाकडे शिफारस करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत शहराच्या विकासाशी निगडित अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले.  
*​गावठाण जागांना नंबर मिळणार*
​नगर परिषद हद्दीतील गावठाण जागांना नंबर मिळण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय जलशुद्धीकरण केंद्रासाठी मंजूर असलेल्या पार्किंग शेडचे बांधकाम योग्य करणे, पंपिंग स्टेशन रोडवरील पुलासाठी संरक्षक कठडे, जाहिरात फलक, बॅनर व होर्डिंगची योग्य संहिता (कोड) तयार करून शहराचे विद्रूपीकरण थांबविण्यावरही सविस्तर चर्चा झाली.                                  *​कचरा व्यवस्थापन आणि दंडात्मक कारवाई*
​सभेत केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाने घनकचरा व्यवस्थापन नियम २७ जानेवारीला अधिसूचित करत १ एप्रिलपासून लागू केले आहेत. त्यानुसार भगूर नगर परिषदेची उपविधी तयार करण्यावर विस्तृत चर्चा झाली. यामध्ये कचऱ्याचे स्रोतस्थानी वर्गीकरण, मोठे कचरा उत्पादक, वापरकर्ता शुल्क आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.  
*​रस्ते व शहर सौंदर्यीकरण*
​सभेत काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहर विद्रूपीकरण होणार नाही याबाबात नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी सभेला आश्वस्त केले. तसेच कर संकलन वाढविण्यावर सकारात्मक चर्चा झाली.  
​या सभेला मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल, उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, नगरसेवक विशाल बलकवडे, दीपक बलकवडे, काकासाहेब देशमुख, शंकर करंजकर, बबलू जाधव, सागर चंद्रमोरे, अमोल इंदारखे, नगरसेविका कांता गायकवाड, कापसाबाई साळवे, जयश्री देशमुख, सुजाता शिरसाठ, सुचित्रा बुरके, लता थापेकर, अश्विनी भवर, सोनाली सोनवणे, डॉ. मृत्युंजय कापसे, अभियंता सिद्धेश मुळे, नगररचना रोशन उगले यांच्यासह नगर परिषदेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या