नाशिक जिल्ह्याचा दुष्काळसदृश यादीत समावेश करण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 06/10/2026 10:03 AM

नाशिक जिल्ह्याचा दुष्काळसदृश यादीत समावेश करण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
​नाशिक प्रतिनिधी:
नाशिक तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या अत्यंत बिकट व संकटाच्या परिस्थितीतून जात असून, नाशिक तालुक्याचा दुष्काळग्रस्त/दुष्काळसदृश तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात यावा, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पार्टीच्या नाशिक तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे  निवेदन सुपूर्द करण्यात आले आहे.  
​कर्जबोज्याखाली शेतकरी कोलमडला
​निवेदनात नमूद केल्यानुसार, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (NDCC), राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था आणि खाजगी सावकारी कर्जामुळे जिल्ह्यातील शेतकरी पार कोलमडून गेला आहे. थकीत कर्जामुळे जमिनी कोणत्याही क्षणी लिलावात निघतील अशी भीतीदायक आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  
​शेतीचा खर्च प्रचंड वाढला, उत्पन्न घटले
​शेतकऱ्यांसमोरील प्रमुख समस्यांवर निवेदनात प्रकाश टाकण्यात आला आहे:
​मजुरी व बियाण्यांची महागाई: शेतमजुरी अवास्तव वाढली असून वेळेवर मजूर मिळत नाहीत. बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते, विद्राव्य खते, बुरशीनाशके आणि कीटकनाशकांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत.  
​कृषी निविष्ठांची बनावटगिरी व लुटमार: उत्पादक कंपन्या व ठराविक मक्तेदार विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची प्रचंड लूट आणि फसवणूक होत आहे.  
​इंधन व यंत्रसामग्रीची महागाई: शेतीसाठी लागणारे इंधन, शेती औजारे आणि यंत्रसामग्री प्रचंड महाग झाल्यामुळे शेतीचा खर्च परवडेनासा झाला आहे.  
​निसर्गाची अवकृपा: या सर्व अडचणींमध्ये निसर्गाचा लहरीपणा आणि अनिश्चितता यामुळे शेती व्यवसाय पूर्णपणे तोट्यात गेला आहे.  
​या सर्व कारणांमुळे नाशिक तालुका व जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, प्रशासनाने तात्काळ नाशिक तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी भाजप नाशिक दक्षिण जिल्हा अध्यक्ष  ​श्री. सुनील नवले .​श्री. नामदेव ढिकले.भाजप नाशिक दक्षिण उपजिल्हाध्यक्ष .​श्री. सुनील गायधनी. भाजप नाशिक दक्षिण जिल्हा चिटणीस  
​श्री. रावसाहेब  ढिकले  भाजप नाशिक तालुका (पूर्व मंडल) अध्यक्ष .​इंजि. श्री. अरुण खांडबहाले – भाजप नाशिक तालुका (पश्चिम) अध्यक्ष  
​श्री. राजेंद्र राजे – भाजप नाशिक तालुका व्यापारी आघाडी अध्यक्ष .​श्री. नितीन ढिकले – किसान आघाडी अध्यक्ष  ​श्री. कनक सुनील चव्हाण – भाजप युवा मोर्चा अध्यक्ष .​श्री. पंकज भाऊ शेलार  
​श्री. ॲड. अरुण भोसले  
​श्री. पंकज सुरेश शेलार  
​श्री. हरिश्चंद्र रामभाऊ बोराडे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे

Share

Other News

ताज्या बातम्या