*भगूर मध्ये अंगणवाडी सेविकांचा सन्मान संपन्न* अंगणवाडी सेविकांच्या त्यागमय समर्पणापुढे देश नतमस्तक: तानाजी भोर
अंगणवाडीत बालकांवर होणारे संस्कार देशाला पुढील १०० वर्ष मार्गदर्शक ठरतील कारण या अंगणवाडी सेवकांच्या संस्कारातून तयार होणारी पिढीच आत्मनिर्भर भारताची ताकद आहे असे गौरव उदगार भाजपा नाशिक जिल्हा दक्षिणचे उपाध्यक्ष श्री तानाजी भोर यांनी व्यक्त केले. देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या जनसेवेच्या २५ वर्ष पूर्ती निमित्य नाशिकच्या समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने अंगणवाडी सेविकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री तानाजी भोर बोलत होते.
आजही अंगणवाडी हे आमच्या देशाचे शक्ती केंद्र आहे आणि हे शक्ती केंद्र आगामी काळात अधिक विकसित करण्यासाठी भाजपा तसेच समर्पण प्रतिष्ठान अंगणवाडी सेवकांच्या सोबत कायम उभी असून पुढेही या ईश्वरीय कार्यात योगदान देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंगणवाडी सेवकांची तपश्चर्या आज देशाला मार्गदर्शक आहे त्यांचा सत्कार करण्याचा योग म्हणजे परमेश्वराच्या पूजनाचा आनंद आहे असे भावनिक वक्तव्य भगूर नगरपरिषदेचे उपनगराध्य श्री प्रसाद आडके यांनी करत या सेविकांच्या कार्याचे कौतुक या प्रसंगी केले.
अंगणवाडी सेविकांचे परिश्रम देशाला एक सुसंस्कारित पिढी देत आहे त्यांच्या त्यागाचे करावे तितके कौतुक थोडे आहे. आजचा सत्कार समारंभ म्हणजे मानवतेच्या देवतेची प्रार्थना करण्या सारखा शुभ योग आहे असे प्रतिपादन समर्पण प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ मानसी वाळिंबे यांनी या प्रसंगी केले.
अंगणवाडी सेविकांचा सत्कार म्हणजे त्याग तपस्येचा दर्शन घडवण्याचा कार्यक्रम असून त्या दर्शनाला एक विशेष महत्व आहे असे प्रतिपादन एकनाथराव शेटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृत्युंजय कापसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. अंगणवाडी केंद्र प्रमुख रेखा सुरेश शिंदे यांनी सर्व अंगणवाडी सेविकांच्या वतीने सत्कारास उत्तर देत आपले मनोगत व्यक्त केले.
या कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यास भगूरचे भाजपा नगरसेवक सौ सुजाता शिरसाट, सौ विद्या बलकवडे, श्री दीपक बलकवडे, श्री अमोल इंदारखे , श्री बबलू जाधव , श्री संदीप शेटे, श्री अक्षय रोकडे, श्री मकरंद परांजपे, श्री चंद्रशेखर पिल्दे, सौ वैभवी पिल्दे, सौ क्षमा रिसोडकर, सौ शिल्पा लोणारी श्री मंगेश वाळिंबे याच बरोबर कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी भगूर शहरातील अंगणवाडी केंद्र प्रमुख रंजना निकम, सुषमा देशमुख, लता गायकवाड, रेखा शिंदे,अनिता सिरसाठ, सुगंधा पढेर, सविता कासार, ललिता देशमुख उपस्थित होत्या, या सर्वांचा सन्मान येथे करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सुप्रिया हांडोरे, रोहिणी जगताप, राधिका रॉय, ज्योती भामरे, प्राजक्ता जोशी, प्रेरणा कुलकर्णी, अश्विनी ठाकरे टिळे, पुनम मगर पाटील, ममता शिराळ, प्रा. शेरॉन, भरत सपकाळे, मिलिंद कोकाटे, वैभव गायकवाड, सौरभ खर्डे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार शिंगणे यांनी केले.