सांगली : नुकतेच पुणे शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सदर निवडणुकीसाठी कुपवाड सांगली येथील भारत सरकार चा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. अनिल देवदान मोहिते सर यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तो आज छाननी मध्ये पात्र ठरलेला आहे.
अनिल मोहिते सर यांना ३६ वर्षाचा प्रदीर्घ शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आहे. तसेच पुरोगामी शिक्षक संघटना व स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.
देवदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष असून संस्थेच्या माध्यमातून गेली १० वर्षे राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार देण्याची परंपरा सुरु ठेवली आहे. संस्थेकडून अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.
त्यांनी यापूर्वी सांगली मिरज कुपवाड मनपा निवडणूक, सांगली अर्बन बँक निवडणूक, शिक्षक बँक सांगली निवडणूक आदी निवडणुका लढवल्या आहेत.
इतर राजकीय पक्ष व विविध सामाजिक राजकीय संघटना श्री. अनिल मोहिते सर यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत.
शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक म्हणून अनिल मोहिते सर हे योग्य पर्याय म्हणून सर्वासामान्य चेहऱ्या च्या रूपात मतदारांवर छाप पाडतील हे नक्कीच..