नांदेड – येथील नांदेड शहराला सिडको-हडको भागाशी जोडणाऱ्या रस्त्यावरील पिव्हीआर टॉकीज समोर, नवीन कौठा, कुशीनगर, नांदेड या ठिकाणी वाहनांची सतत वाढणारी गर्दी व भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा अपघात होत आहेत. या भागात सिग्नल किंवा स्पीड ब्रेकर नसल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे तसेच रस्ता ओलांडणे अत्यंत कठीण झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भरधाव वाहनांमुळे व या भागात सिग्नल व स्पीड ब्रेकर नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अपघातांची संख्या वाढत असल्याने, यावर त्वरित उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. स्पीड ब्रेकर व सिग्नल लावल्यास, वाहनांचा वेग नियंत्रित करता येईल आणि नागरिकांच्या सुरक्षेला मदत होईल. तरी याठिकाणी त्वरीत गतिरोधक व ट्रॅफिक सिग्लन उभारावा अशी मागणी या भागातील युवा कार्येकर्ते जय लव्हाळे, सुनील अनंतवार व नागरीकांनी केली आहे.