सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मनपा फिश मार्केट बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न्

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/01/2025 5:54 PM

  सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात तिन्ही शहराच्या साठी अद्यावत फिश मार्केट  मनपाच्या मागणीनुसार उपलब्ध करून देणार ,खणभाग मध्ये नव्याने होणाऱ्या फिश मार्केट साठी शीतगृह व एक मजला वाढीव मंजुरी देणार ,सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेले फिश मार्केट तयार करण्याकडे लक्ष केंद्रित करणार  --मा.ना.श्री. नितेशजी राणे मंत्री मत्स्यव्यवसाय, बंदरे, महाराष्ट्र राज्य

 दि १०/१/२०२५ रोजी सांगली  येथील   सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका वतीने  अद्यावत फिश मार्केट बांधकाम भूमिपुजन मा.ना.श्री. नितेशजी राणे मंत्री मत्स्यव्यवसाय, बंदरे, महाराष्ट्र राज्य
यांच्या  हस्ते   संपन्न झाला आहे.

प्रास्ताविक मा रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त यांनी केले ,या वेळी नव्याने बांधण्यात येणार  साधारणपणे ८,कोटी इतक्या रक्कमेचे आधुनिक फिश मार्केट बाबत माहिती देत असताना या ठिकाणी ८१ गाळे उभारण्यात येणार आहे, स्वच्छता ,पाणी,  आणि सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे  या वेळी सांगण्यात आले आहे, 

ऍड स्वातीताई शिंदे नगरसेवक यांनी थोडक्यात या फिश मार्केट बाबत इतिहास सांगून अध्यावत  फिश मार्केट उभे करण्यासाठी केलेले प्रयन्त आणि आलेले यश या ठिकाणी आपला अनुभव  नमूद करून फिश मार्केट मधील व्यवसायिक यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे .

मा विशालदादा पाटील खासदार यांनी अद्यावत फिश मार्केट  भूमी पूजन कार्यक्रमास शुभेच्छा देऊन शहराच्या विकास कामात कायम सहकार्य करणार असल्याचे  या वेळी सांगितले आहे .

मा शुभम गुप्ता आयुक्त यांनी या वेळी बोलताना सांगितले की,  सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी  तिन्ही शहरासाठी फिश मार्केट आवश्यकता आहे. सांगली येथील अद्यावत इमारतीत शीतगृह ही सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तसेच आणखीन एक मजला बांधण्यासाठी वाढीव मंजुरी देण्याची देखील या वेळी  विनंती मा मंत्रीमहोदय यांच्या कडे करून नागरिकांच्या वतीने  मागणी केली .त्या वर  मा मंत्रीमहोदय यांनी सत्वर  तत्वता मागणी मान्य करून  फिश मार्केट बाबत सर्व मागण्या मान्य करून तशा प्रस्ताव प्राप्त होताच मान्यता  देण्यात येईल असे सांगण्यात आले, भविष्यामधील फिश मार्केट आणि फिश व्यवसाय बाबत सर्व  प्रश्न सुटलेला आहे .

मा.ना.श्री. नितेशजी राणे मंत्री मत्स्यव्यवसाय, बंदरे, महाराष्ट्र राज्य यांनी  नव्याने होणारी फिश मार्केट हे आधुनिक सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारे बांधण्यात येऊन त्यांच्या वापर फिश विक्रेत्यांनी चांगला करावा ,पुन्हा रस्त्यावर व्यवसाय न करता फिश मार्केट मध्ये व्यवसाय  करून नागरिकांना चांगल्या प्रतीचा फिश उपलब्ध करून देणे आवश्यक आहे असे या वेळी सूचित केले आहे.

मा शुभम गुप्ता ,आयुक्त व मा नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी  नवीन फिश मार्केट मध्ये शीतगृह आणि आणखीन एक मजला ही सुविधा देण्याबाबत च्या प्रस्तावास मान्यता मिळाली आणि तिन्ही शहरांमध्ये फिश मार्केट उपलब्ध करून ध्यावे  या बाबत  व्यक्त केल्या मतास मा मंत्रीमहोदय यांनी मान्यता देऊन प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याचे या वेळी  सांगितले आहे .

या वेळी श्रीमती तुप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली,  फिशरी विभागाचे अधिकारी , भाजप पदाधिकारी सम्राट महाडिक , भाजप जेष्ठ सामाजिक कार्यकत्या ,निताताई केळकर ,माजी आमदार  नितीन राजे शिंदे,माजी स्थायी समिती सभापती निरंजन  आवटी ,माजी सभागृह नेता युवराज बावडेकर  नगरसेवक सुनंदा राऊत, सुजित  राऊत , अल्ताप शिकलगार, मयूर पाटील, गीतांजली ढेपे पाटील , महेंद्र चांडाळ शिवसेना ,भाजप पदाधिकारी कार्यकर्ते  शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण  ,उप आयुक्त विजया यादव ,सहा आयुक्त नकुल जकाते , मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद ,नगरसचिव सहदेव कावडे  ,नगररचनाकार  राजेंद्र काकडे , वैभव वाघमारे ,मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, 
आभार शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी मानले कार्यक्रम संपन्न झाला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या