कुपवाड : येथील पहिले नोटरी झाल्याबद्दल ॲड.राजेश आदगोंडा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. स्नेहजित प्रतिष्ठान, तथास्तू ज्येष्ठ नागरिक संघ, कुपवाड शहर पत्रकार संघ यांच्या संयुक्त समारंभात सत्कार झाला. निवृत्त अभियंता कल्लाप्पा कवठेकर यांच्या हस्ते अॅड.पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सन्मती गौंडाजे, रंगराव शिंपुकडे, महावीर कोथळे, चंद्रकांत उपाध्ये, नेमगोंडा पाटील, गणी मुजावर,सुरगोंडा पाटील, श्री. शेंडगे यांचेसह नागरिक उपस्थित होते. कुपवाड मधील नागरिकांसाठी सदैव तत्पर सेवा देण्याची हमी यावेळी अॅड. पाटील यांनी दिली. स्नेहल गौंडाजे यांनी आभार मानले.