औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 10/01/2025 8:04 PM

नांदेड :-  स्वामी विवेकानंदाची जयंतीचे औचित्य साधून श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. व्ही सुर्यवंशी यांनी केले आहे.
यात विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला, क्रीडा स्पर्धा इ. स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्वामी विवेकानंदाच्या जीवनचरित्राची माहिती प्रशिक्षणार्थ्यांना व्हावी यासाठी प्रमुख वक्त्याचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदाची जयंती असल्यामुळे हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. युवक हे देशाचे भविष्य व आधारस्तंभ आहेत. स्वामी विवेकानंद हे भारताचे महान आध्यात्मिक गुरु आणि विचारवंत म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपले आयुष्य युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी तसेच त्यांचे विचार आणि आदर्श आजदेखील लाखो युवकांना मार्गदर्शक आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या