*ति.झं.विद्यामंदिर शाळेत नायलॉन मांजा वापरणे बंदी बाबत शपथ*
भगूर (वार्ताहर) नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित विद्यामंदिर भगूर या शाळेत नायलॉन मांजा वापरणार नाही व वापरून देणार नाही याबाबत शपथ घेण्यात आली यावेळी नायलॉन माझ्यामुळे होणाऱ्या पक्षी माणसे व वस्तूंचे किती नुकसान होते याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच नायलॉन मांजा वापरणे किती घातक आहे व नायलॉन मांजा वापरणाऱ्या वर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो असे विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर मुलांनी नायलॉन मांजा वापरणार नाही व वापरून देणार नाही अशी शपथ घेतली
यावेळी शाळेतील मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते व सर्व शिक्षक रवींद्र नाकील,हेमंत काशीकर,संदीप पाटील,कुंदन गवळी,कैलास टोपले, उषा आव्हाड,माया सिसोदे व शिक्षकेतर कर्मचारी सुनील शेटे,चीमा सापटे, दिगंबर माळी यांनीही नायलॉन मांजा बंदी विषयी शपथ घेतली