तर मग मनपाचे पैसे जातात कुठे? : सतिश साखळकर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/01/2025 11:33 AM

 पत्रकार दीपक चव्हाण हे सलग दुसऱ्या वर्षी सांगली शहरातील स्पीड ब्रेकर स्वखर्चाने कलर करत आहेत त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे 
धन्यवाद दिपकराव 
मात्र सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये पॅचवर्क करण्याचे काम महापालिका स्वतः मटेरियल विकत घेऊन करत आहे व सदर कामांमध्ये असे स्पीड ब्रेकर रंगवण्याचे सुद्धा काम समाविष्ट आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार वार्षिक 2, कोटी 50 लाख रुपये  सदर काम आहे 
मग त्या कामांची बिले कशी उतरली जातात कोण उतरवते त्याच्यावर सह्या कोण करते त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन कोण करते याबाबत मा आयुक्त साहेबांनी चौकशी करावी कारण सदर कामाचे टेंडर झाले असताना पत्रकारांना अशा पद्धतीने जर स्पीड ब्रेकर रंगवायला लागत असतील तर मनपाचे पैसे जातात कुठे हा खरा प्रश्न आहे 
तसेच ज्या ज्या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीचा कालावधी आहे त्या ठिकाणचे खड्डे कोण भरते तसेच पॅचवर्क ज्या ज्या ठिकाणी केले जाते त्याचा देखभाल दुरुस्तीचा कार्यकाल किती आहे याचा लेखाजोखा सुद्धा तपासला पाहिजे

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली 

Share

Other News

ताज्या बातम्या