अ.भा.मराठी साहित्य संमेलनात साईनाथ रहाटकर यांच्या कवितेची निवड झाल्याने त्यांचा सत्कार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 09/01/2025 2:36 PM

नांदेड- येथील सुप्रसिद्ध कवी साईनाथ रहाटकर यांच्या कवितेची दिल्ली येथे संपन्न होणार्‍या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवीकट्टा या सदरात निवड झाल्याने अक्षरोदय साहित्य मंडळाच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
अक्षरोदय साहित्य मंडळाच्या सहयोगनगर स्थित कार्यालयात दि. 5 जानेवारी 2025 रोजी कवीसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी मारोती मुंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत चव्हाण, बालीका बरगळ, कवी उषाताई ठाकूर, कवी सदानंद सपकाळे, मंडळाचे व्यवस्थापक मनिषा सपकाळे, पंकज कांबळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.
कवी साईनाथ रहाटकर यांची ‘नाते’ ही कविता दिल्ली येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निवड झाल्याने त्यांचा अक्षरोदय साहित्य मंडळाच्यावतीने यथोचित सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या