जुना बुधगाव रस्ता रेल्वे उड्डाण पूलाचे काम रेंगाळले, प्रशासनाकडून मिळेना प्रतिसाद

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/01/2025 2:40 PM

सांगली येथील जुना बुधगाव रस्ता रेल्वे उड्डाण पुलाचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडलेले आहे 
आम्ही आज सकाळी जागेवर जाऊन पाणी केली असता सदर ठिकाणी महाराष्ट्र रेल कंपनीने तसेच स्थानिक जागामालक श्री माळी यांनी मनपा नगर रचना विभागाकडे परिसर मोजणी करून हद्द ठरण्याबाबत मे पासून मनपाकडे अर्ज केलेले आहेत मात्र आज तागा आहेत त्याबाबत मोजणी करून हद्द फायनल झाली नसल्यामुळे पुलाचे काम रखडलेले आहे 
एका बाजूला वाहतूक कोंडी आणि शहरातील वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी सदर पूल होणे किती आवश्यक आहे हे गरजेचे असताना एका स्वायत्त संस्थेमार्फत सदर कामाला खो घालण्याचं काम होताना दिसत आहे 
माननीय आयुक्त गुप्ता साहेब यांच्याकडे सुद्धा त्यांनी स्मरणपत्र दिलेला आहे या माध्यमातून मा.आयुक्त यांना विनंती आहे आपण वैयक्तिक याबाबत तातडीने लक्ष घालून सदर मोजणी व हद्द फायनल करून घेण्यासाठी नगररचना विभाग असेल यांना आदेश द्यावेत व पुलाचे रखडलेले काम लवकरच होण्यासाठी मदत करावी अशी विनंती आहे 

अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल 

सतीश साखळकर पद्माकर जगदाळे माजी आमदार नितीन शिंदे हणमंत पवार उमेश देशमुख शंभुराज काठकर नितीन चव्हाण प्रशांत भोसले राहुल पाटील 

सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या