नांदेड :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिमायतनगर येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त 12 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त निबंध, वादविवाद स्पर्धा तसेच उद्योजकांचे मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरी माजी प्रशिक्षणार्थी, नियमित प्रशिक्षणार्थी व त्यांचे पालकांनी या उपक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य जे. एल. गायकवाड यांनी केले आहे.