*वडूज आगाराचे स्थानकप्रमुख निलेश माने यांची तडकाफडकी बदली*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 09/01/2025 2:45 PM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

वडूज दि:तालुका खटाव येथील वडूज एसटी आगाराचे स्थानक प्रमुख म्हणून श्री. निलेश माने यांनी  कार्यभार स्वीकारल्यापासूनच ग्रामीण भागातील एसटी वाहतूक वारंवार बंद ठेवून ग्रामीण भागातील  शालेय विद्यार्थी आणि जनतेच्या दळणवळणाचा खोळंबा केला होता.
विशेष म्हणजे शेनवडी येथील एका महिलेने मुक्कामी बस अचानक रद्द का केली असे विचारले असता माने साहेबांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती तसेच ती महिला मी वरिष्ठांकडे तक्रार करेन असे म्हणल्यानंतर कोणाकडे तक्रार करायची आहे तिकडे करा असे उत्तर दिले होते हे प्रकरण डीएसपी न्यूज लाइवचे संपादक दत्तात्रय फाळके यांनी लावून धरले होते व मुक्कामी फेऱ्या रद्द करणाबद्दल पण दत्तात्रय फाळके वरिष्ठांकडे सतत संपर्क साधत होते.
ग्रामीण भागातील प्रवासाचा मुख्य स्रोत असणारी एसटी वाहतूक सुरळीत चालू असावी, ग्रामीण भागातील मुक्कामी बस नियमितपणे चालू ठेवाव्या यासाठी  प्रवासी वाहतूक संघटना, पत्रकार आणि प्रवाशांनी वारंवार विभागीय कार्यालयाकडे तक्रारी केल्यानंतर अखेर एसटी प्रशासनाने निलेश माने यांची तडकाफडकी वाई या ठिकाणी बदली केली.

Share

Other News

ताज्या बातम्या