सांगली सिव्हील हॉस्पिटल आवारात जिल्हा शल्य चिकित्सक अंतर्गत नेत्र तपासणी व शत्र्यक्रिया कक्षा मध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उपचारासाठी दाखल होणाऱ्या गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची प्रतीक्षा करण्याच्या सोयीसाठी निवारा शेडची व्यवस्था होणे अत्यंत आवश्यक होते.
याकरीता
सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम यांचे कडे मी सातत्याने पत्रव्यवहार, पाठपुरावा करून सदर काम मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले.
सदर कामाची गरज पाहून जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सदर कामास मंजुरी दिली.
दिनांक ८ जानेवारी २०२५ या निवारा / प्रतीक्षा शेडच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम,
मी स्वतः शिवसेनेचे सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नानासाहेब शिंदे , स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे
महेश खराडे, ग्राहक पंचायतचे डॉ ज्ञानचंद्र पाटील,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता इरफान मुजावर,विर सेवा दलाचे संघटक जे.जे.पाटील, माजी मंत्री जयंतराव पाटील यांचे स्विय सहाय्यक मोहनभैय्या चव्हाण, प्रकाश बरडोले, प्रशांत चव्हाण यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय रुग्णालयाचा स्टाफ उपस्थित होता.