*माजी विद्यार्थी मेळावा व गौरव सोहळा उत्साहात*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 09/01/2025 4:36 PM

*माजी विद्यार्थी मेळावा व गौरव सोहळा उत्साहात*
 श्री एकनाथराव सहादू शेटे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ  महाविद्यालयामध्ये  माजी विद्यार्थी मेळावा  पार पडला. या कार्यक्रमास संस्थेचे सहकार्यवाह जितेंद्रजी भावसार ,महाविद्यालयाचे प्राचार्य मृत्युंजय कापसे, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी गणेशजी कस्तुरे  व जयरामजी चव्हाणके  आणि ज्या माजी विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश संपादन केलेले आहे त्यांनी व त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होते या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आदित्य कस्तुरे, हर्षल ढोकणे यांचे अग्निवीर व ओम आंबेकर याचे सी. आय. एस. एफ मध्ये निवड झाल्याबद्दल  त्यांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा.राजू सानप यांनी केले. यानंतर  माजी विद्यार्थ्यांनी  सध्याच्या विद्यार्थ्यांना आपापल्या क्षेत्रातील तसेच विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा आणि यश संपादन करताना येणाऱ्या अडचणींना सामोरे कसे जावे याबाबत मूलमंत्र दिला.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्रजी भावसार  यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संयोजन  प्रा.रोहिणी जगताप यांनी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया धोंगडे व आभार प्रा. अश्विनी  ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा. प्राजक्ता जोशी, प्रा.मेघा काळे, प्रा.श्रुती जोशी, प्रा. धनश्री ठाकूर प्रा. अमलेश भोंगाडे,प्रा.अंकुश कुंदे, प्रा.केतन बोरसे यांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमाची सांगता पसायदान घेऊन करण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या