नांदेड :- बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण व जाहीर सभेसाठी आज शनिवारी ५ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर सकाळी १०.३० वाजता आगमन झाले.
गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर आगमनानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण,खा.अजित गोपछडे,आ.बालाजी कल्याणकर,आ.भीमराव केराम,आ.डॉ. तुषार राठोड,आ.राजेश पवार,पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंग,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. १०.३५ ला ते पोहरादेवीकडे रवाना झाले.
सकाळी ११ वा. पोहरादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. पोहरादेवी येथील कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर सहभागी होणार आहे.
प्रधानमंत्र्यांचा पोहरादेवी
येथील कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे...
सकाळी ११ ला वाशिम जिल्ह्यातील पोहारादेवी हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. पोहरादेवी येथील जगदंबा मंदिरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधी स्थळाचे ते दर्शन घेतील. सकाळी ११.१५ वा. बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे ते लोकार्पण करतील. त्यानंतर दुपारी ११.३० वा. पोहरादेवी येथील जाहिर सभेमध्ये ते जनतेला संबोधित करतील. दुपारी १२.५५ वा. पोहरादेवी येथून प्रस्थान करून १.४५ वाजेच्या सुमारास नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी १.५० ला नांदेड विमानतळावरून ते मुंबईकडे प्रयाण करतील.