कुमठे(ता. तासगाव) : येथील पार्वती महादेव पाटील (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुमठे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पार्वती पाटील यांनी आपल्या आयुष्यात कुटुंबाची जबाबदारी सांभाळत प्रेम, माया आणि आपुलकीने सर्वांना जोडून ठेवले होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी एक प्रेमळ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.