भगूर शहरात 'स्वर दीपोत्सव' उत्साहात संपन्न; पैठणी व फराळ वाटपाचेही आकर्षण
भगूर प्रतिनिधी:
दिवाळीच्या उत्सवानिमित्त नाशिकच्या भगूर शहरात नागरिकांच्या मनोरंजनासाठी आणि आनंदात भर घालण्यासाठी 'भगूरपुत्र वीर सावरकर जयंती उत्सव समिती'च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य 'स्वर दीपोत्सव' (स्वरांचा दीप, सुरांचा उत्सव) या गोडमधुर गीतांच्या महोत्सवाचे दिमाखात आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमास रसिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संगीत व काव्यमयी मैफिलीने रंगला सोहळा
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वीर सावरकर व श्री गणेशाच्या संगीतमय आरतीने करण्यात आली. त्यानंतर या संगीत सोहळ्यात इंटरनॅशनल युथ फेस्टिव्हल गोल्ड मेडलॉजिस्ट, उत्तर महाराष्ट्र आयडॉल आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट' सेमि फायनललिस्ट श्री. हर्षद गोळेसर तसेच 'संगीत सम्राट' आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट' सेमि फायनललिस्ट सौ. दुहिता गोळेसर यांनी आपल्या सुरेल आवाजात भक्तिगीते, हिंदी प्रेमगीते आणि मार्मिक शेर-शायरीच्या काव्यमैफिलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमात "केली आणि मंगेश पाडगावकर यांच्या या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" तसेच "सप्तरंगात न्हाऊन आली माझी ही दिवाळी", "हीम वर्षावात ही तारका लाजरल्या मनातुन" यांसारखी बहुसंख्य प्रसिद्ध गीते सादर करण्यात आली. प्रमुख गायकांना श्री. स्वामीराज भिसे (निवेदक), श्री. आकाश बैरागी (साईड रिदम), श्री. संस्कार जानोरीकर (हार्मोनियम मास्टर), श्री. कृष्णा नवगीरे (पखवाज चालक), श्री. निनाद कुष्णवलेकर (तब्बल वादक) आणि श्री. हर्षद वडजे (किबोर्ड वादक) यांनी उत्तम संगीतसाथ दिली.
विशेष पैठणी व फराळ वाटप
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे उपस्थित महिला भगिनींसाठी ठेवण्यात आलेले पैठणी वाटप ठरले. कार्यक्रमादरम्यान ११ भाग्यवंत महिलांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पैठणीचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांसाठी फराळ वाटपाचेही आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमात सर्व कलाकारांचा सन्मान सहायक पोलिस आयुक्त श्री. शेखर रामदास बागडे, कामगार नेते श्री. प्रशांत रामदास कापसे आणि माजी पोलिस अधीक्षक श्री. रमेश मोहन पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच, ११ महिलांना आकर्षक पैठणी वाटप सोहळा सौ. विद्याताई प्रशांत कापसे, आशा राजेंद्र बागडे, कल्याणी अनिल पवार, नगरसेविका सोनाली विक्रम सोनवणे, विजया नंदू चव्हाण, प्राजक्ता कैलास बागडे, पुनम अभिजीत शेंदूर, कविता सुभाष जाधव, जयश्री देशमुख आणि ईश्वरी आडके यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी श्री. अनिल पवार, रवींद्र मालुंजकर, विक्रम सोनवणे, संग्राम करंजकर, संदीप शेटे. सुभाष जाधव, वसंत पाटील, काकासाहेब देशमुख.अशोक मोजाड, शाम भागवत, राजेंद्र बागडे, संग्राम गायकवाड, शिवाजी घुगे. श्याम देशमुख.सुमित चव्हाण.प्रताप गायकवाड. दादासाहेब देशमुख. रोहित चव्हाण श्याम ढगे .यांच्यासह वीर सावरकर जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वरांचा दीप आणि सुरांच्या या अनोख्या संगीतमय उत्सवाने भगूरवासीयांची दिवाळी अधिक आनंददायी ठरली.