आ. श्रीजया चव्हाण यांची ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी साजरी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 12/11/2026 6:34 AM

नांदेड :- भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी लक्ष्मीनगर, देगाव–येळेगाव, येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना परिसरात ऊसतोड कामगारांसमवेत दिवाळी साजरी केली. 

आ. श्रीजया चव्हाण यांनी दिवाळी निमित्त ऊसतोड कामगारांना दिवाळीच्या शुभेच्छा देत भेटवस्तू व मिष्टान्नाचे वाटप केले. त्यानंतर त्यांनी कामगारांच्या कुटुंबीयांसमवेत स्नेहभोजनाचाही आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, माजी चेअरमन गणपतराव तिडके यांच्यासह कारखान्याचे संचालक, शामराव पाटील टेकाळे, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निळकंठ मदने, भाजपा युवा मोर्चा अर्धापूर तालुकाध्यक्ष पवन इंगोले, सोशल मीडिया अध्यक्ष गुरुदास रणखंब आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या