सांगली (शिवतीर्थ) :
दिवाळी पाडव्याच्या शुभ दिनाचे औचित्य साधून ‘संकल्प युवा महाराष्ट्र राज्य’च्या वतीने सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्फूर्ती स्थळ (शिवतीर्थ) येथे ‘एक दिवा शिवछत्रपतींसाठी, एक दिवा दुष्काळग्रस्तांच्या मदतीच्या संकल्पासाठी’ या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत भव्य दीपोत्सव कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
या सामाजिक उपक्रमाची सुरुवात आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रा. पद्माकर जगदाळे यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या चरणी दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
संकल्प युवाचे संस्थापक अध्यक्ष सागर खंडागळे यांच्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीच्या संकल्पनेतून आणि शिवजन्मोत्सव समिती, संकल्प युवा महाराष्ट्र परिवार, विविध सामाजिक संघटना व शेकडो शिवप्रेमींच्यावतीने हा दीप अभिवादन सोहळा पार पडला. दीपोत्सवामुळे शिवतीर्थ परिसर दिव्यांच्या रोषणाने आणि देशभक्तीमय वातावरणाने उजळून निघाला होता. दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा संकल्प सोडत शिवप्रेमींनी या अनोख्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी नगरसेवक मयूरशेठ पाटील, डॉ. संजय पाटील, प्रशांतदादा भोसले, शरद साळुंखे, प्रदीप कर्वेकर, राहुल पाटील, योगेश सूर्यवंशी, डॉ. जयश्री पाटील, नितीनदादा चौगुले, सतीश मामा वाघमारे, प्रथमेश खिलारे, अविनाश मासाळ, सनमुख हडपद, अमोल कणसे, शरद बापू देशमुख, सागर राजपूत, प्रणव गुडसे, प्रा. अजिंक्य मोहिते, अवधूत सदामते, वैभव वाघमोडे, सतीश शिकलगार, सुनील मामा शिंदे, नीता आवटी, श्रीकांत आवटी, सुमित भोसले, यश भोसले, सुमित कांबळे, गौरी तोडकर, हर्षदा भोसले, वेदिका भोसले, इमॅन्युअल मद्रासी, स्वरूप पाटील, विवेक पाटील, अमित भोसले, किरण मुळे यांच्यासह शेकडो शिवप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.