सांगली कृष्णाकाठचा यंदाचा दिवाळी अंक समर्पित आहे त्या तरुणाईला ज्यांनी आपल्या प्रश्नावर या समाजाला चांगलंच हादरवून सोडलं. अनेकांना सुखावून सोडलं. आणि अनेकांना जमिनीवर आणलं. या घटनांच्या ग्राउंड रिपोर्ट पासून प्रत्यक्ष आंदोलनात उतरलेल्यांच्या मनातील भावनांपर्यंत त्यांच्या नेतृत्वाच्या उदयापासून ते एका 17 वर्षे युवकाच्या सीबीएससी परीक्षेतील घोटाळा उघड करण्याच्या पद्धतीपर्यंत आणि एका पेपर घोटाळा उघडकीस करणाऱ्या शिक्षकाच्या धाडसापर्यंत... हा रेजिम चेंज आहे का आणि असेल तर तो कसा असेल... या सगळ्यावरील भाष्य तुम्हाला माझ्या अंकातून वाचायला मिळेल. जवानीच्या भाषेवर आक्षेप घेणाऱ्यांना त्याच जवानांपैकी एकाने दिलेले उत्तर येथे वाचायला मिळेल आणि आजपर्यंत तरुणांनी केलेल्या आंदोलनाचा जगभराचा आढावा देखील तुम्हाला या अंकात सहज मिळेल... शिवाय कृष्णाकाठच्या अंकाची प्रत्येक वर्षीची जी वैशिष्ट्य आहेत ती सगळी तुम्हाला या अंकात पाहायला मिळतील.... अवश्य वाचा सांगली कृष्णाकाठ दिवाळी अंक 2026. मुखपृष्ठा सोबतच अनुक्रमणिका ही देत आहे...
शंभूराज आप्पासाहेब काटकर
संपादक सांगली कृष्णाकाठ