प्रधानमंत्री आवास योजनेतील अतिरिक्त ३५ हजार रुपये रखडले; जामखेड प्रशासनाने अनुदानाची तारीख जाहीर करावी

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 10/11/2026 10:03 PM

जामखेड : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जामखेड तालुक्यात मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी देय असलेले अतिरिक्त ३५ हजार रुपयांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यास अडथळे निर्माण होत आहेत.

शासनाकडून अतिरिक्त अनुदानाची तरतूद करण्यात आली असताना प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम अद्याप जमा झालेली नाही. त्यामुळे हे अनुदान नेमके कधी मिळणार, असा प्रश्न लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

जामखेड तालुक्यात किती लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबित आहे, शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे का, निधी उपलब्ध असूनही वितरणास विलंब का होत आहे आणि निधी उपलब्ध नसल्यास तो कधी प्राप्त होणार, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

या संदर्भात पंचायत समिती जामखेडचे गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून प्रलंबित अनुदानाची सद्यस्थिती, लाभार्थ्यांची संख्या आणि अनुदान वितरणाची अपेक्षित तारीख कळविण्याची मागणी करण्यात येत आहे.

घरकुल हे सर्वसामान्य कुटुंबांचे स्वप्न असून, अनुदानाअभावी लाभार्थ्यांची गैरसोय होणे योग्य नाही. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित अतिरिक्त ३५ हजार रुपयांचे अनुदान तातडीने वितरित करावे, अशी मागणी **'आपलं सत्य अहिल्यानगर'**च्या वतीने करण्यात येत आहे.


#जामखेड #घरकुलयोजना #प्रधानमंत्रीआवासयोजना #घरकुलअनुदान #अहिल्यानगर

रवीकुमार शिंदे 

माहिती अधिकार व मानवाधिकार कार्यकर्ता 

हिंदी मराठी पत्रकार संघ तालुका संघटक 

भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव

Share

Other News

ताज्या बातम्या