कृषि उत्पन्न बाजार समिती, सिन्नर
पांडुर्ली उपबाजार येथे टोमॅटो शेतमालाच्या खरेदी-विक्रीचा रविवारी होणार शानदार शुभारंभ
भगुर (प्रतिनिधी):
कृषि उत्पन्न बाजार समिती सिन्नर संचलित पांडुर्ली उपबाजार येथे टोमॅटो शेतमालाच्या खरेदी-विक्रीचा भव्य शुभारंभ रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.४५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन नाशिक लोकसभेचे खासदार मा. राजाभाऊ प्रकाशशेठ वाजे यांच्या शुभहस्ते आणि बाजार समितीचे सभापती श्री. शरदराव (बापू) ज्ञानदेव थोरात व उपसभापती सौ. सिंधुताई केशवराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
शेतकऱ्यांना आवाहन:
पांडुर्ली व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी आपला टोमॅटो शेतमाल पांडुर्ली उपबाजार आवारातच आणून, त्याची योग्य प्रतवारी (Grading) करून २२ किलो जाळीसह विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळ, सचिव, कर्मचारी वर्ग, व्यापारी वर्ग, हमाल व माथाडी कामगार वर्ग तसेच संलग्न घटकांतर्फे करण्यात आले आहे.