भगूर परिसर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिक्षक गौरव समारंभ संपन्न
विध्यार्थी घडवण्याचे कार्य, त्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे महत्वपूर्ण कार्य शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघ भगूर चे काळजीवाहू अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केले, भगूर परिसर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक गौरव समारंभात केले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान फेस्कॉम चे श्रीराम कातकाडे,, पिसाळ साहेब आदी मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमात रमेश फडोळ , विश्वास सोनवणे, वसंतराव खैरनार, परदेशी सर , पवार सर आदींचा सत्कार मायेची शाल, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतराव खैरनार यांनी केले, सूत्रसंचलन नारायणराव आडके यांनी तर आभार प्रशांत कापसे यांनी मानले कार्यक्रमास जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते, यशस्वी करण्यासाठी मारुतीराव कोरडे, अंबादास पाटील, अंबादास मुठाळ , रमापती चव्हाण, रतन लोट आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.