स्वा. सावरकर समितीने जपला दातृत्वाचा वसा! नासाका विद्यालयातील २४ विद्यार्थ्याना स्कूलबॅगचे वाटप

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 21/10/2026 7:19 AM


​स्वा. सावरकर समितीने जपला दातृत्वाचा वसा! नासाका विद्यालयातील २४ विद्यार्थ्याना स्कूलबॅगचे वाटप

​भगुर (विशेष प्रतिनिधी):

गेल्या ३५ वर्षांपासून भगूर आणि पंचक्रोशीत सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेल्या 'भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती उत्सव समिती'च्या वतीने होतकरू विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून समितीने आपला दातृत्वाचा वसा कायम जपल्याचे दिसून आले.

​नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे आणि मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांपासून 'दातृत्वाचा ज्ञानयज्ञ' हा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे. याच उपक्रमांतर्गत स्वा. सावरकर जयंती उत्सव समिती आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या विशेष सहकार्यातून नासाका माध्यमिक विद्यालयातील २४ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले.

​हा कार्यक्रम ज्येष्ठ पत्रकार सुधाकर गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. या प्रसंगी मंचावर:​समितीचे संस्थापक तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश पवार ​कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर.​भगूर नगरपरिषदेचे नगरसेवक दीपक बलकवडे.​सेवानिवृत्त जिल्हा वनाधिकारी राजेंद्र कापसे.समितीच्या नियोजन समितीचे अध्यक्ष अनिल पवार.​कार्याध्यक्ष वसंतराव पाटील.​सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंतराव खैरनार.समितीचे सरचिटणीस प्रशांत कापसे.नासाका बचाव संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विलास गायधनी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमा दरम्यान दीपक बलकवडे, अनिल पवार आणि वसंतराव खैरनार यांनी आपल्या मनोगतातून सावरकर उत्सव समितीच्या सामाजिक व सेवाभावी कार्याचा गौरव केला. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या शैक्षणिक सुविधांचा योग्य वापर करून ज्ञानसंपन्न व्हावे, असा मोलाचा सल्ला दिला.

​समाजातील गरजू घटकांसाठी सातत्याने राबविल्या जाणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सावरकर जयंती उत्सव समितीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी केले, तर संग्राम करंजकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

​

Share

Other News

ताज्या बातम्या