जामखेडमध्ये भाजप किसान मोर्चाची तालुका कार्यकारिणी जाहीर
चंद्रकांत गाढवे आणि दत्तात्रय गिरी यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड
जामखेड प्रतिनिधी | रवीकुमार शिंदे
जामखेड : भाजप किसान मोर्चाच्या जामखेड तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भगवान (दादा) मुरुमकर आणि भाजपचे तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या कार्यकारिणीत चंद्रकांत सूर्यभान गाढवे (खुटेवाडी) आणि दत्तात्रय भगीरथ गिरी (रत्नापूर) यांची भाजप किसान मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच आनंद उद्धव कोळपकर (नान्नज) आणि सुशांत विजय काळे (धनेगाव) यांचाही पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. सुशांत विजय काळे यांच्याकडे सोशल मीडिया प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या निवड कार्यक्रमाला भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भगवान (दादा) मुरुमकर, ज्येष्ठ नेते दत्तात्रय (आप्पा) वारे, भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष तुकाराम कुमटकर, माजी उपसरपंच गौतम कोल्हे, सोशल मीडिया तालुका प्रमुख किशोर देवमुंडे, रत्नापूरचे सरपंच अशोक जाधव, युवा नेते जमाल शेख, सोमनाथ दरे, अशोक ठकाण, विलास मोरे आणि महादेव नलवडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या नियुक्त्यांमुळे जामखेड तालुक्यात भाजप किसान मोर्चाच्या संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.
— रवीकुमार शिंदे
जामखेड हिंदी-मराठी पत्रकार संघ, तालुका संघटक
आपलं सत्य अहिल्यानगर
#BreakingNews
#MarathiNews
#Jamkhed
#Ahilyanagar