हिरक महोत्सवी वर्षात ‘शिक्षण मंडळ भगूर’चा उपक्रम: नूतन करिअर अकॅडमीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
भगूर (विशेष प्रतिनिधी):
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नामांकित ‘शिक्षण मंडळ भगूर’ संस्थेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत असून, संस्था यंदा आपला हिरक महोत्सव साजरा करत आहे. अंगणवाडीपासून ते पदवीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या या संस्थेने हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भगूर व परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे योग्य व किफायतशीर मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘नूतन करिअर अकॅडमी’ची सुरुवात केली आहे. या अकॅडमीचा भव्य उद्घाटन सोहळा आज, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी नूतन विद्यामंदिर, देवळाली कॅम्प येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
पोलीस भरती, सैनिकी शिक्षण, MPSC आणि सरळ सेवा भरती यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्याच परिसरात व सहजतेने करता यावी, या मुख्य हेतूने या अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे.या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री. एकनाथराव शेटे उपस्थित होते. तसेच, उपकार्याध्यक्ष मा. श्री. अनंतराव अथणी, संस्थेचे कार्यवाह श्री. सचिन पाटील, सहकार्यवाह श्री. जितेंद्र भावसार, खजिनदार श्री. अनिलजी कवडे, कार्यकारिणी सदस्य श्री. सतीश कुलकर्णी, कायमसेवक प्रतिनिधी श्री. गणेश चव्हाण, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. मृत्युंजय कापसे, सौ. कातकाडे मॅडम, नूतन करिअर अकॅडमीचे समन्वयक श्री. भरत सपकाळे आणि अकॅडमीचे प्रमुख श्री. मोरे हे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह श्री. सचिन पाटील सर यांनी केले व उपस्थितांचे स्वागत केले.सहकार्यवाह श्री. जितेंद्र भावसार यांनी अकॅडमी सुरु करण्यामागची पार्श्वभूमी व तिचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.अकॅडमीचे प्रमुख श्री. मोरे सर यांनी अकॅडमीच्या भावी योजना, अभ्यासाचे स्वरूप आणि पुढील वाटचालीबाबत सविस्तर माहिती दिली
अध्यक्षीय भाषणात श्री. एकनाथराव शेटे यांनी नूतन करिअर अकॅडमीच्या भावी वाटचालीस व उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या सुवर्णसंधीचा पूर्ण लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे," असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करावेत, असेही संस्थेतर्फे सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री. विलास म्हसाळ यांनी केले. उपस्थितांच्या प्रतिसादात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.