नारी शक्तीचा आविष्कार देशाची ताकद: सुजाता शिरसाट

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 19/10/2026 1:13 AM

नारी शक्तीचा आविष्कार देशाची ताकद: सुजाता शिरसाट


वेदांतीत काळा पासून नारी शक्तीचे धर्म रक्षणासाठी योगदान अविस्मरणीय आहे.  नारी शक्तीच्या तेजोमय आविष्काराच्या ताकतीनेच आपला भारत देश आत्मनिर्भरतेच्या संकल्पाने जागतिक महासत्ता म्हणून स्वतःला सिद्ध करतो आहे,आणि याचा अभिमान आपल्या सर्वांना  तेजस्वी राष्ट्र निर्माणाच्या कडे मार्गक्रमण करण्याची प्रेरणा देत आहे. असे गौरव उदगार भगूर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ सुजाता शिरसाट यांनी व्यक्त केले. नाशिकच्या समर्पण प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची कुलस्वामिनी अष्टभुजा देवीच्या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवा निमित्य आयोजित कुंकूमार्चन सोहळ्या प्रसंगी सौ शिरसाट बोलत होत्या. आज नारी शक्तीने अष्टभुजेला देशाच्या विकासाचे साकडे घातले असून, आजच्या कुंकूमार्चन सोहळ्यात उपस्थित महिलांनी परत एकदा दुर्गाशक्ती आत्मसात केली आहे ही आनंदाची बाब आहे. हा सोहळा फक्त कुंकूमार्चन सोहळा नसून हा राष्ट्र निर्मिती करता नारी शक्तीच्या तेजोमय आविष्काराचा सोहळा आहे असे प्रतिपादन सौ शिरसाट यांनी केले. 

कुंकूमार्चनाच्या निमित्त ग्रामीण भागातील महिला देखील  एकत्र येऊन राष्ट्राच्या उत्कर्षासाठी संकल्पित होत आहे याचा अभिमान आज संपूर्ण महाराष्ट्राला आहे. या ठिकाणी उपस्थित प्रत्येक महिला देशाचा सन्मान आहे ,देशावर अपप्रवृत्तीचे आक्रमण करू इच्छिणाऱ्या विचार धारेचा समूळ नायनाट करण्यासाठी आज नारी शक्तीचा जागर होतो आहे. असे गौरव उदगार भगूर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ विद्या बलकवडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

हिंदू धर्माच्या प्रत्येक धार्मिक स्थळी होणारा नारीशक्तीचा आविष्कार देशाला सुजलाम सुफलाम करेल आणि त्यासाठी नारीशक्तीचे संघटन करण्यासाठी समर्पण प्रतिष्ठान कटिबद्ध आहे असा विश्वास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ मानसी वाळिंबे यांनी  या प्रसंगी व्यक्त  केला. 

भगूरच्या श्री खंडोबा देवस्थानचे मुख्य पुजारी श्री वसंतराव खैरे ,  उपनगराध्य श्री प्रसाद आडके, नगरसेवक प्रा डॉ मृत्युंजय कापसे, स्वा सावरकर जन्मोत्सव समितीचे कार्याध्यक्ष संदीप शेटे, विशाल शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या दिमाखदार आणि परंपरागत पद्धतीने पार पडला.

या सोहळ्याला समर्पण प्रतिष्ठानच्या सौ वैभवी पिल्दे, सौ क्षमा रिसोडकर, सौ विदुला  राजहंस, सौ टिपरे ताई,सौ ज्योती कापसे, सौ सारिका शेटे याच बरोबर श्री खैरे यांच्या परिवारातील महिला आणि भगूर गावातील महिला उपस्थित होत्या. या प्रसंगी श्री आकाश गुरुजी यांनी पौरोहित्य केले.

Share

Other News

ताज्या बातम्या