*नाशिक येथे नवयुवक कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन*; महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना सन्मानपूर्वक निमंत्रण
नाशिक:
नवयुवक कुंभार समाज विकास संस्था, नाशिक जिल्हा यांच्या वतीने लवकरच एका भव्य राज्यस्तरीय कुंभार समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या महत्त्वपूर्ण मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राचे माननीय महसूल मंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना आज संस्थेच्या वतीने सन्मानपूर्वक निमंत्रण पत्र देण्यात आले.
शासन निर्णयाबद्दल कृतज्ञता व सत्कार सोहळा
कुंभार समाजासाठी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय (GR) उपलब्ध करून देण्यात महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. समाजाने घेतलेल्या भूमिकेनुसार आणि त्यांनी केलेल्या या विशेष सहकार्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील कुंभार समाजाच्या वतीने ना. बावनकुळे यांचा विशेष सत्कार व सन्मान सोहळा देखील या मेळाव्यात संपन्न होणार आहे.
या राज्यस्तरीय मेळाव्याच्या माध्यमातून कुंभार समाजाची एकजूट अधिक मजबूत करणे, समाजाच्या विविध अडीअडचणी व प्रश्नांवर सखोल चर्चा करणे, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीला नवी चालना देणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. समाजाच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि समाजकार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करणे हा या आयोजनाचा मुख्य हेतू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रसंगी नवयुवक कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. निलेशभाऊ राऊत, शिवसेनेचे भगुर शहराध्यक्ष मा. विक्रमभाऊ सोनवणे, नाशिक जिल्हा भाजपा ग्रामीण अध्यक्ष मा. सुनील बच्छाव, राष्ट्रवादी पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष मा. गजानन शेलार, जिल्हा युवक अध्यक्ष मा. चेतन सोनवणे, नाशिक तालुका अध्यक्ष मा. गोकुळशेठ सोनवणे, इगतपुरी तालुका वीटभट्टी आघाडी अध्यक्ष मा. नंदूशेठ जाधव टाकेदकर, इगतपुरी तालुका सचिव मा. नवनाथ जगदाळे, क्लस्टर योजनेचे प्रदेश अध्यक्ष मा. सुदामभाऊ वैद्य, इगतपुरी तालुका अध्यक्ष मा. सागर वाकचौरे, युवक अध्यक्ष मा. कृष्णा भागवत, तसेच मा. संदीपशेठ सोनवणे, मा. हरीषशेठ सोनवणे, मा.संतोष सोनवणे मा. मनोज सोनवणे, मा. नितीन जगदाळे, मा. गणेश जगदाळे, मा. सोमनाथ जौर्वेकर, मा. सिद्धार्थ वाकचौरे, मा. सार्थक वाकचौरे, मा. प्रशांत सपकाळे आदींसह अनेक प्रमुख मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.