श्री छत्रपती शाहू महाराज अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वणी येथे विश्वकर्मा जयंती व शस्त्रपूजन सोहळा उत्साहात संपन्न
~ वणी, दि. १९ ऑक्टोबर २०२६ : श्री छत्रपती शाहू महाराज अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वणी येथे सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त शस्त्रपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्याला श्री.छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था,वणी चे सचिव श्री.ओमप्रकाशजी चचडा सर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सदस्य श्री. विक्रांत चचडा सर अध्यक्ष म्हणून होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री. सतीश बासिस्कर सर आणि राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अभय पारखी सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री छत्रपती शाहू महाराज अशासकीय आयटीआय, वणीचे प्राचार्य श्री. सतीश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या सोहळ्यात आयटीआयच्या इलेक्ट्रिशियन ट्रेडचे निदेशक श्री. निकेश भोंगळे सर आणि मेकॅनिक डिझेल ट्रेडचे निदेशक श्री. प्रभाकर मिलमिले सर यांच्यासह दोन्ही ट्रेडमधील सर्व प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे, संस्थेचे प्राचार्य, निदेशक आणि प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच औद्योगिक प्रशिक्षणात वापरल्या जाणाऱ्या अवजारांचे व उपकरणांचे विधिवत करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने पूजा करून श्रम, कौशल्य, तंत्रज्ञान आणि कार्यसंस्कृती यांचा सन्मान करण्यात आला.
भगवान विश्वकर्मा हे स्थापत्य, अभियांत्रिकी आणि विविध कलाकौशल्यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त प्रशिक्षणार्थींनी आपल्या तांत्रिक कौशल्याचा विकास करून भविष्यात कुशल कारागीर आणि जबाबदार तंत्रज्ञ बनण्याचा संकल्प केला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यासोबतच प्रत्येक व्यवसायामध्ये प्रथम येणाऱ्या प्रशिक्षणार्थीचा अध्यक्ष व पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून तांत्रिक शिक्षणासोबतच श्रमप्रतिष्ठा, शिस्त, कौशल्य आणि आपल्या कार्यातील साधनांविषयी आदरभाव जपण्याचा संदेश देण्यात आला.