प्रभाग समिती क्र ३ च्या सहा. आयुक्त श्वेता सुर्वे यांच्याशी सामाजिक कार्यकर्त्यांकडून अभिनंदनपर भेट, कुपवाडच्या विविध प्रश्नांवर केली चर्चा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/10/2026 4:13 PM

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका च्या प्रभाग समिती क्र 3 च्या सहा. आयुक्त पदी श्वेता सुर्वे मॅडम यांची नेमणूक झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच कुपवाड मधील बहुतांशी भाग गुंठेवारी मध्ये येत असल्याने विकास कामाबाबत सांगली मिरज शहरांपेक्षा मागे आहे तसेच लक्ष्मी मंदिर सुतगीरणी कुपवाड गावठाण मुख्य रस्त्या वरील फेरीवाले यांच्या अतिक्रमण बाबत सविस्तर चर्चा केले मा सुर्वे मॅडम यांनी त्वरित याची पाहणी करून योग्य ते निर्णय घेण्याचे आश्वासन दिले यावेळी सामाजिक कार्यकर्ते शुभम गिड्डे पाटील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खोत व इतर नागरिक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या