भगूरला ग्रामदैवत श्री मारुती मंदिरात प्रांण प्रतिष्ठा सोहळा मूर्तींची भव्य शोभायात्रा ग्रामस्थांचा सहभाग भगवंताचा जयघोष

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 15/02/2026 8:53 PM

भगूरला ग्रामदैवत श्री मारुती मंदिरात प्रांण प्रतिष्ठा सोहळा मूर्तींची भव्य शोभायात्रा ग्रामस्थांचा सहभाग भगवंताचा जयघोष

भगूर वार्ताहर :- भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील  गावाकऱ्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री मारुती मंदिर जीर्णोद्धार, समितीच्या वतीने महाशिवरात्रीच्या औचित्य साधून काल रविवार दि. १५ ते  २०  दरम्यान बजरंग बली,श्री विठ्ठल रुक्मिणी देवी,शिवलिंग व नंदी महाराज मूर्ती प्रतिष्ठा तथा कलशारोहन  संत म्हाहत्म्याच्या  हस्ते  विविध पूजाविधीवत हवन  कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीने केली आहे.
ग्राम दैवत मारुती मंदिरात महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर संतांच्या मनात्रोत्सवात रविवारी दि. १५  रोजी सकाळी आठ वाजता नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे,उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, नगरसेवक काकासाहेब देशमुख,
विशाल बलकवडे,दिपक बलकवडे मनीषाताई कस्तुरे अमोल इंदारखे यांच्या यांच्यासह भगूर पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त व भजनी मंडळ सह सर्व नगरसेवक नगरसेविका विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या तालात भगवंताचा जल्लोष करत भव्य शोभायात्रा मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. प्राणप्रतिष्ठा ग्राम दक्षिणा .सोमवार दि १६ ,१७ रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा पूजनाचा सर्व मंडळ मांडणी,यज्ञकुंड मांडणी,यज्ञकुंडम मांडणी,पूर्वतयारी मुख्य प्राणप्रतिष्ठा पूजन विधी प्रारंभ बुधवारदि.१८  रोजी सकाळपासून प्रायचित्त संकल्प,प्रधान संकल्प,गणेश पुण्याहवचन प्रयोग,मातृ का मंडल स्थापना,वारसा धारा पूजन ,आयुष्य मंत्राचा नोंदी,श्राद्धप्रयोग,पर्यावरणात अशा विविध पूजांचे रुद्र मंडळ देवता स्थापन ब्रह्ममंडल देवता आवाहन नवग्रह हवन,उटीर होम प्रदान हवन सर्व प्रतिष्ठित मूर्तींना जलधीवास सायपूजन,महाआरती आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार १९ रोजी सकाळी स्थापित देवता प्रांत: पूजन प्रासाद वास्तु प्रयोग शालकर्म प्रधान यजन,प्रतिष्ठित मूर्तींना व शिखर कलाशस कुंभानी, विशेष सिद्ध द्रव्यांनी,स्नान समांत्र ज्ञान चा मंत्र विधी कौतुक सूत्र बंधन,धान्य धिवास, शय्या धिवास,न्यासविधी,निद्रा आव्हान, सायन पूजन महाआरती सांगता.आयोजन  शुक्रवारी दि 20 रोजी स्थापित मंडल देवता प्रात: पूजन, महाभिषेक, कर्मशीला ब्रह्मंपिंडीका पूजन, प्रसाद दीक्षित होम , प्रधान हवान प्रतिष्ठा होम स्थापित देवता होम उत्तरांग हवन, पूजन बलिदान पूजन शिखर कलश स्थापना, आगीन सह मूर्तींची प्रदान प्राणप्रतिष्ठा ध्वजारोहण पूर्णाहुती होते. पूजन महाआरती पूजनहवण होणार असून या धार्मिक सोहळा्याचे
साक्षीदार आणि भक्तांच्यास उपस्थित पार पडणार असून यानंतर भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती  मंडळाच्या आयोजकांनी दिली आहे. सदर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा लाभ भगूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन ग्रामदैवत श्री मारुती मंदिर ट्रस्ट भगूर मंदिर समितीचे अध्यक्ष किशोर मोजाड,उपाध्यक्ष योगेश चंद्रात्रे,सचिव सुनील जाधव,सहसचिव शांताराम शेटे 
 खजिनदार अशोक लोया, ट्रस्टी- काकासाहेब देशमुख,अनिल पवार, अशोक हासे,भुषण करंजकर आदींसह मंदिर समितीने केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या