"राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली, तरुणांना आणि स्थानिक जनतेच्या शिफारसीनुसार विकासाला पुढे नेण्यासाठी कटिबद्ध।"
आज सागली येथे राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांची तसेच पक्षाच्या प्रमुख पदाधिकान्यांची बैठक झाली. या बैठकीत जयंत पाटील साहेबांनी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्याना सूचना दिल्या की सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणूक 2026 साठी पक्ष पूर्ण ताकदीने उतरला आहे.
या निवडणुकीत पक्षाने ठरवले आहे की उमेदवार निवडताना प्रत्येक प्रभागात थेट लोकांशी संवाद साधला जाईल. प्रभागात जाऊन लोकांच्या शिफारसीनुसार आणि त्या प्रभागाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. त्याचबरोबर तरुण उमेदवारांना जसे डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि समाजसेवक-यांना विशेष प्राधान्य दिले जाईल, जेणेकरून शहराच्या प्रश्नांना नवीन दृष्टीकोन आणि युवाशक्ती मिळेल.
इच्छुक उमेदवारांनी दिनांक 7 ते 10 तारखेपर्यंत वसंत मार्केट यार्ड, सांगली येथील पक्ष कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज भरावेत. 11 तारखे पासून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रलेक प्रभागात जाऊन, जनतेच्या अभिप्रायावरून उमेदवार ठरवतील.
शहराच्या विकासावर लक्ष देत पाणीपुरवठा सुधारणा, खड्डेमुक्त रस्ते, औद्योगिक वाढ आणि रोजगाराच्या संधी या सर्व बाबींवर पक्ष भर देत आहे.
आ. जयंत पाटील यांनी सांगली येथे घेतलेल्या बैठकीस पक्षाचे शहर अध्यक्ष संजय बजाज, पक्ष निरीक्षक शेखर माने, युवक अध्यक्ष राहुल पवार, माजी नगरसेवक धनपाल खोत, चंद्रकांत हुलवान, विजय घाडगे, अभिजीत भोसले, शेडजी मोहिते, रज्जाक नाईक, पवित्रा केरीपाळे, संगीता हारगे, मनगू आबा सरगर, अपर्णा कदम, अझम काजी, शिवाजी दुर्वे, मुस्ताक रंगरेज, सचिन जगदाळे, तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.