आवाहन

चिमुकल्यांनी बनवले पर्यावरण पुरक आकाशकंदील

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 06/10/2025 4:49 PM

चिमुकल्यांनी बनवले पर्यावरण पुरक आकाशकंदील
भगूर :- नूतन विद्या मंदिर शाळेत पर्यावरण पुरक आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा १०ते १२ या वेळेत संपन्न झाली. ७ वी ते १० वी मधील २०० विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते.यावेळी टीनटेड पेपर प्लोरोसेन्ट पेपर,लेस, डिंक,सुई, दोरा,असे पर्यावरण पुरक साहित्यासह विद्यार्थी हजर होते.कला शिक्षक, विशाल सिरसाठ यांनी कंदील बनवण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसह शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे, कार्यवाह सचिन पाटील,सहकार्यवाह जितेंद्र भावसार, मुख्याध्यापक विजय सानप, उपमुख्याध्यापक अनिल कवडे, पर्यवेक्षिका कमल सोनवणे श्री दत्त पेट्रोल पंपाचे संचालक बापू बावरे,सदस्य नितीन करंजकर आदींसह पालकांनी कार्यशाळेत उपस्थिती दर्शवली.

Share

Other News

ताज्या बातम्या