आवाहन

न्यायमूर्ती भुषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न प्रवृत्तीचा राष्टवादी श. प. पक्षाकडून निषेध

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/10/2025 8:17 PM

सांगली: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री भूषण गवई हे न्यायालयाचे कामकाज पहात असताना एका सनातनी मनुवादी माथेफिरू वकिलाने त्यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला.

 अशा सनातनी मनुवादी प्रवृत्तीचा आज सांगली शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने  निषेध करून आंदोलन करण्यात येणार आले, सदर आंदोलन हे सांगली तील स्टेशन रोड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर करण्यात आले 

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे शहरजिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सदर घटनेचा निषेध करत सदर सनातनी मनोवादी वृत्तीच्या माणसावर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी त्यांनी दिला 

यावेळी उत्तम कांबळे ,तानाजी गडदे, आयुब बारगिर ,डॉ शुभम जाधव ,महालिंग हेगडे , शितल खाडे , विद्या कांबळे, संगिता जाधव ,सुरेखा सातपुते , छाया पांढरे , प्रणवी पाटील,तेजश्री अवघडे,अकबर शेख, फिरोज मुल्ला ,विनायक हेगडे, सरफराज शेख, अभिजित रांजणे, विजय जाधव ,कुमार वायदंडे,संजय सुंगारे ,अमित चव्हाण , भारत चौगुले,समशेर चौगुले, आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या