मुंबई दि ७,
क्रांती अग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.शरदभाऊ लाड यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री.रवींद्रजी चव्हाण व उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री व पालकमंत्री सांगली जिल्हा मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळयांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघासह ग्रामीण भागात भाजपा पक्षाला मोठे बळ मिळणार आहे.
या सोहळ्यास भाजपा सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्रामभाऊ देशमुख, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपा नेते पृथ्वीराज पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम व इतर मान्यवर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.