आवाहन

प्रा. कृष्णा आलदर चांचा मराठवाडयातील पूरग्रस्तांसाठी प्रेरणादायी सामाजिक पुढाकार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/10/2025 8:22 PM

सांगली :मराठवाडा विभागात आलेल्या विनाशकारी पुरामुळे हजारो नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आपत्तीच्या काळात मदतीचा हात पुढे करत प्रा. कृष्णा नंदा मारुती आलदर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आपला एक महिन्याचा पगार देऊन सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

या वेळी त्यांनी मा. मुख्यमंत्री महोदयांना सांगितले की,

“सांगलीमध्ये दरवर्षी येणाऱ्या महापुरामुळे आम्हाला पूरग्रस्त नागरिकांच्या वेदना आणि संकटांची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत व्हावी या सद्भावनेतून हा छोटासा प्रयत्न करत आहे.”

                प्रा. कृष्णा आलदर यांचा हा सामाजिक उपक्रम समाजात सकारात्मकतेचा व संवेदनशीलतेचा संदेश देणारा ठरला आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नागरिकांनीही शक्य त्या पद्धतीने पुढे यावे, असे त्यांनी यावेळी आवाहन केले. त्यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक सचिन वाघमोडे आणि दशरथ जाधव उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या