पूर्वी सेंट्रल गव्हर्मेंटचे (रेल्वे विभाग) काम म्हणजे एक स्टॅंडर्ड होतं एक बेस होता..
वसगडे रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यासाठी रेल्वे बोर्डाने जिल्हाधिकारी यांच्याशी पत्र व्यवहार केला होता आम्ही आंदोलनाची इशारा दिल्यानंतर आम्हाला सुद्धा पत्र दिले होते मात्र ह्या सगळ्या तारखा ओलांडून गेले आहेत तरीसुद्धा रेल्वेचा कारभार हा भंपकपणाचा वाटत आहे.
आणि आपले लोकप्रतिनिधी यांना काय म्हणावे...? सदर रस्त्यावरून रोज वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची जी कोंडी होत आहे त्याची जबाबदारी कोणाची आहे
लोकशाही लोकप्रतिनिधी कशासाठी निवडून द्यायचे असतात याचा विसर लोकप्रतिनिधी आणि जनतेला पण पडलेला आहे असेच म्हणावे लागेल
सतीश साखळकर
सांगली.