*सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार दिवसेंदिवस लोकांसमोर येत आहे. महापालिका क्षेत्रातील बोगस नळ कनेक्शन असतील, रस्त्यावर दोन दोन तीन तीन महिने लिकेजच्या नावाखाली काढलेले धोकादायक खड्डे असतील. हे सारे पाहत आहे महापालिका प्रशासनाचे पर्यायाने आयुक्तांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत आहे* *असाच एक प्रकार समोर येत आहे आकाशवाणी सांगली केंद्राच्या पाठीमागे सहनिवास कॉलनीमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून पाणीपुरवठा विभागाने खड्डा खणला असून तो तिथल्या नागरिकांसाठी तो धोकादायक ठरला असून या संदर्भात अनेक वेळा महापालिका संबंधित विभागाकडे नागरिकांनी तक्रार करूनही याकडे कानाडोळा होत आहे.*
*या खड्ड्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे यामुळे लोकांच्या घरामध्ये कमी दाबाने पाणी येण्याची समस्या निर्माण झाली आहे. शिवाय या खड्ड्यातील पाण्याला दुर्गंधी सुटली असेल पाणीपुरवठा विभागाने याकडे ताबडतोब लक्ष देऊन सदरचा खड्डा मुजवावा आणि होणारी दुर्घटना टाळावी अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने करत आहोत*
*येत्या दोन दिवसात सदरचा खड्डा नमुजवल्यास महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत आहोत*.
*मनोज भिसे - अध्यक्ष लोकहित मंच सांगली*