आवाहन

महावितरणचा ट्रान्सफॉर्मर झुडुपाच्या विळख्यात, सुधारणा करा अन्यथा आंदोलन : लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/10/2025 1:21 PM

* *सांगलीतील पत्रकार नगर भागातील शिव पार्क अपार्टमेंट गाळा नंबर 10 च्या अपोजिट स्फूर्ती स्टेट परिसरात महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे. या ट्रान्सफॉर्मरच्या खाली तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गवत झाडे झुडपे वाढली असून यामुळे सापांचा तसेच डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आसपासच्या नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. याकडे महानगरपालिका आरोग्य विभाग तसेच महावितरण विभाग या दोन्ही विभागांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यानेच मोठ्या प्रमाणात हे गवत वाढल्याचे दिसत आहे. महानगरपालिका आरोग्य विभाग आणि महावितरण या दोघांनीही या समस्येकडे ताबडतोब लक्ष घालून लोकांना होणारा त्रास टाळावा. अन्यथा महानगरपालिका तसेच महावितरण कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही लोकहित मंचच्या वतीने देत आहोत.*                                

  *मनोज भिसे-अध्यक्ष लोकहित मंच सांगली*

Share

Other News

ताज्या बातम्या