आवाहन

गनिमि कावा आंदोलनाच्या इशार्‍याने प्रशासन कोल्हापूर रोडवर...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/10/2025 3:57 PM

पालकमंत्री यांना गनिमी काव्याने घेरावा घालणार म्हटल्यावर जिल्हाधिकारी काकडे साहेब यांनी कोल्हापूर रोड येथे सार्वजनिक बांधकाम विभाग मनपा उपायुक्त स्मृती पाटील भूमी अभिलेख अधिकारी यांना घेऊन पाहणी करून संबंधित सूचना दिल्या आहेत.


कोल्हापूर रोड चे ग्रहण काही केल्या कमी व्हायला तयार नाही...

परवाच्या पावसामुळे पाणी साठलं म्हणून महापालिकेने मुरूम टाकला त्या मुरमाचा चिखल झाला त्या चिखलात अडकून काल गाड्या पडून राहिल्या अपघात झाले आम्ही समाज माध्यमावर आवाज उठवला रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी पाहणी केली आम्ही त्यांना परवाच सांगितले होते पाण्याचा निचरा केला पाहिजे.
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते पाण्याचा निचरा करण्याचे काम महापालिकेची आहे 
जागतिक बँकेकडून 100 फूटी ते अंकलीपर्यंत गटारी मंजूर झालेले आहे त्याची टेंडर प्रक्रिया सुरू असून त्यामुळे त्याबाबतचा निर्णय कोणीच घेऊ शकत नाही.
त्याची परिस्थिती पाहता तिथं माणसं मारण्याची वाट बघत आहे का प्रशासन असेच म्हणावे लागेल 
तसेच 30 का 35 मीटरचा वाद मी कागदपत्रे उपलब्ध केली मात्र अतिक्रमण काढायचे सोडून अजून मोजणी केली पाहिजे त्याचे पैसे भरा असे टोलवाटोलवी चालू आहे तसेच पाण्याच्या पाईपलाईन शिफ्ट केले नसल्यामुळे सध्याचे काम करताना मोठ्या प्रमाणात पाण्याचे पाईपलाईन फुटण्याचे प्रमाण आहे.
अतिक्रमण तशीच आहेत महावितरणचे डांब रस्त्याच्या मधोमध यायला लागलेले आहेत 
याबाबत महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र मीटिंग घ्या म्हणतोय त्याबाबत कोणालाही सोयर सुतक पडलेले दिसत नाही.
येत्या चार-पाच दिवसात एकत्र मीटिंग घेऊन सदर विषय मार्गी नाही लावल्यास कोल्हापूर रस्त्यावर अचानक न सांगता रस्ता रोको करण्यात येणार आहे तसेच पालकमंत्री यांनासुद्धा गमिनी काव्याने घेरावा घालण्यात येणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहणार आहे.

सतीश साखळकर शंभूराज काटकर अभिजित भोसले रोहित जगदाळे सुमित शिंदे संदीप दळवी राजू नलवडे आनंद देसाई शिवाजी मोहिते रज्जाक नाईक धनंजय वाघ राहुल पाटील प्रशांत भोसले 
स्थानिक सर्व नागरिक....

कोल्हापूर रोड सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या