आवाहन

रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी तर्फे गुणवंत शिक्षकांचा सन्मान

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/10/2025 6:20 PM

सांगली - 
 -५ ऑक्टोबर रोजी  जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ सांगली सिटीतर्फे गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला .

 पॉल हॅरीस फोटोचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . क्लबचे अध्यक्ष श्री रणजीत माळी यांनी स्वागत केले .डायरेक्टर स्नेहल गौंडाजे यांनी  प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला . 
प्रमुख पाहुण्यां सौ. सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते गुणवंत शिक्षकांना सन्मानित करण्यात आले . 
गुणवंत शिक्षक डॉ . प्रा . बाळासाहेब कोटलगी ( एन डी पाटील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सांगली) ,श्री.राजकुमार पवाळकर (श्रीम . सोनाबाई आण्णासो पाटील कन्या शाळा कुपवाड ), सौ .स्वाती बाळू गायकवाड (जिल्हा परिषद शाळा यशवंतनगर ,कुपवाड ),श्री बाळासो ठिकणे ( स्वा सै. ने. स. चौगुले माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल भोसे),श्री पांडुरंग जोशी (डॉ .बापट बाल शिक्षण मंदिर सांगली )यांना प्रमाणपत्र, शाल देवून सन्मानित करण्यात आले . निवृत्त मुख्याध्यापक श्री सन्मती गौंडाजे यांनी गुरुचे महत्त्व सांगितले . शेठ रतिलाल  गोसलिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सुजाता पाटील यांनी आजच्या काळातील शिक्षकासमोरील आव्हाने विशद केली . असिस्टंट गव्हर्नर श्री. सचिन कोले यांनी राष्ट्राची संपत्ती घडवण्याचे काम शिक्षक करत असतात  त्यामुळे अशा गुणवंत शिक्षकांचा गौरव होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले .
यावेळी  असिस्टंट गव्हर्नर श्री धर्मेंद्र खिलारे ,श्री प्रेमराज जाजू,  मंदार बन्ने ,विष्णु शिंदे, क्लबचे सचिव श्री स्वप्निल पाटील , श्री किरण यादव, भाग्येश शहा  इत्यादी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय हिप्परकर यांनी केले .श्री. शशिकांत चौगुले यांनी आभार मानले .

Share

Other News

ताज्या बातम्या