सशक्त भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त युवा मंच आणि भाजपा सांगली जिल्हा यांच्या वतीने आज भव्य *“नमो रन मॅरेथॉन २०२५ – नशा छोडो, राष्ट्र जोडो”* या मॅरेथॉनचे आयोजन उत्साहात पार पडले, ही स्पर्धा नशामुक्त सांगली निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती.
तरुणाईला व्यसनमुक्त आणि राष्ट्रप्रेमी बनवण्याच्या या उपक्रमाला सर्व सांगलीकरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
सांगली विधानसभा क्षेत्रातून तब्बल १५०० हून अधिक स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक, स्वयंसेवक आणि सहभागी यांचे हार्दिक अभिनंदन..!!
यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपा सांगली शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, सर्व भाजपा सांगली शहर जिल्हा पदाधिकारी, माजी नगरसेवक, सर्व मंडल अध्यक्ष, भाजपा शहर जिल्हा युवा मोर्चा पदाधिकारी, युवा मंचचे पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते, नमो रन मॅरेथॉनचे संयोजक, सहभागी स्पर्धक आणि समस्त सांगलीकर उपस्थित होते.