समस्त सांगली शहरातील दानशूर व्यक्तीकडून जमा झालेली मदत पूरग्रस्तांच्या पर्यंत आज सकाळी पोहोच झालेली आहे.
सांगलीहून आनंद देसाई हिरा गिरी हे काल मंगळवार रात्रीच गाडी घेऊन रवाना झाले
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील चवन हिप्परगा या गावात मदत वाटप करण्यात आली.
आम्ही समाज माध्यमातून अति बाधित गावे यांचा शोध घेतला माहिती घेतली आणि सदर गाडी त्या ठिकाणी रमाना केली आहे.
तांदूळ मसूर डाळ बिस्किटे ब्लॅंकेट चटई खराटे पाण्याचे मग , गहू, साखर, तेल, रजई, साड्या, सॅनिटरी नॅपकिन, औषधे ,रोटरी क्लब कडून प्राप्त झालेले साधारण चार हजार कपड्यांची जोड अशा पद्धतीने वस्तू देण्यात आल्या आहेत
ठिकाणी मदत वाटप करत असताना मोठ्या प्रमाणात नागरिकांचे घरांचे नुकसान जनावरांचे नुकसान झालेली आहे.
अजून ही मदत येत आहे ज्यांना कोणाला अजून वस्तू स्वरूपात मदत करायची असेल त्यांनी खणभाग पंचमुखी मारुती रोड येथे ऑफिसमध्ये मदत जमा करावी
ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्व दानशूर सांगलीकरांचे शतशः धन्यवाद...
सतीश साखळकर ,गजानन साळुंखे, मुस्तफा मुजावर ,उदय भडेकर ,शंभूराज काटकर, डॉ संजय पाटील, विकास मगदूम प्रशांत भोसले, राहुल पाटील रुपेश मोकाशी ,सचिन देसाई ,उमेश देशमुख,महेश खराडे