कुपवाड : प्रतिनिधी
कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील चाकण सब स्टेशन मध्ये पूर्वी १० मेगाव्होल्ट अँपिअरचे सब स्टेशन होते त्यांमध्ये आणखीन १० मेगाव्होल्ट अँपिअरचे सब स्टेशन ची वाढ करून आता ते २० मेगाव्होल्ट अँपिअरचे सब स्टेशन झालेले आहे. त्या सब स्टेशन चे उद्घाटन महावितरणच्या स्वतंत्र्य संचालिका निताताई केळकर, हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे संचालक दीपकबाबा शिंदे याच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, महावितरण चे अधिक्षक अभियंता एस.एस. सवाईराम, कार्यकारी अभियंता आप्पासाहेब खांडेकर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग उपस्थित होते.
यावेळी बोलताना केळकर म्हणाल्या की, कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना पूर्वी विजेअभावी आपला उद्योग वाढविता येत न्हवता तसेच नवीन उद्योजकांना व्यवसाय करता येत न्हवता. परतू आता १० मेगाव्होल्ट अँपिअरचे सब स्टेशन ची वाढ केल्यामुळे उद्योजकांना आपला व्यवसाय वाढविता येईल तसेच नवीन उद्योजकांना हि आता आपला व्यवसाय सुरु करता येईल. तसेच ३३/११ केव्ही च्या प्रलंबित असलेल्या सब स्टेशन चे हि काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असेही त्यांनी आश्वासन दिले. तसेच त्यांनी महावितरण बाबत कोणतीही अडचण असल्यास आम्हाला सांगितल्यास त्याचे लवकर आम्ही निरसन करू असेही त्या म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांनी संस्थेचे संचालक रमेश आरवाडे यांनी सदर कामासाठी पाठपुरावा केल्यामुळे सदर काम मार्गी लावले असेही ते म्हणाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मालू यांनी प्रास्ताविकात म्हणाले की कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये आता सगळ्यात मोठा विषय विजेचा होता. तो आपण मार्गी लावला त्याबद्दल कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या वतीने आम्ही आपले हार्दिक अभिनंदन करतो सदर सब स्टेशन मुळे उद्योजकांना थोडा दिलासा मिळाला आहे. कानडवाडी मध्ये देखील बसविण्यात आलेल्या 10 मेगावोल्ट अँपियरचे येत्या 15 दिवसात उद्घाटन होईल. तसेच ३३/११ केव्ही च्या प्रलंबित असलेल्या सब स्टेशन चे काम आपण मार्गी लावावे असे ते म्हणाले.
आभार संस्थेचे संचालक रमेश आरवाडे यांनी मानले यावेळी संस्थेचे संचालक दिपक मर्दा, रमेश भगत, नितीश शहा, पांडुरंग रुपनर, महावितरणचे अति. कार्यकारी अभियंता अनंत उपरे, सहा. अभियंता आश्विन्कुमार बुचडे, अभियंता प्रियांका बिरनगे, उद्योजक भरणीधरण पांडेयन, टेकचंद असिवाल, आयुष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सब स्टेशन च्या उद्घाटन प्रसंगी महावितरणच्या स्वतंत्र्य संचालिका निताताई केळकर, हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे संचालक दीपकबाबा शिंदे, चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, महावितरण चे अधिक्षक अभियंता एस.एस. सवाईराम, कार्यकारी अभियंता आप्पासाहेब खांडेकर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, संस्थेचे संचालक रमेश आरवाडे, दिपक मर्दा, अरुण भगत, पांडुरंग रुपनर आदी मान्यवर उपस्थीत होते.