आठ दिवसांपूर्वी स्टेशन रोडवरील रस्ता मोठ्या डामडौलात तयार करण्यात आला, पण कालच तो उखडला! नागरिकांनी समाजमाध्यमांवर आवाज उठवला, आणि आश्चर्य म्हणजे आज पुन्हा तोच रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले.
🚧 काम निकृष्ट, खर्च प्रचंड!
🚧 ना चौकशी, ना जबाबदारी!
🚧 जनतेच्या पैशांची उधळपट्टी कधी थांबणार?
दुरुस्ती झाली म्हणजे प्रश्न मिटला असं नाही! या हलगर्जीपणाची चौकशी झाली पाहिजे. संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. नागरिकांच्या पैशांचा असा अपव्यय का केला जातो?
🔹 आम्ही मागणी करतो की, या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी!
🔹 प्रशासनाने वारंवार खराब काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले पाहिजे.
🔹 सार्वजनिक निधीची जबाबदारी ही केवळ नागरिकांची नाही, तर प्रशासनाचीही आहे!
📢 लोकहित मंच – जनतेच्या हक्कासाठी कटिबद्ध!